सृजनशील अभिज्ञा: एका अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख

झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील ‘मोनिका’ ची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री ‘अभिज्ञा भावे’ सध्या खूप लोकप्रिय होत आहे. मालिकेतील तिची भूमिका नकारात्मक शेडची असली तरी तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे अल्पावधीतच तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेतील तिच्या वेगवेगळ्या हेयर स्टाईलस् आणि ड्रेसिंगमुळेही ती चर्चेत आहे.

 

गुढीपाड्व्याबद्दल बोलताना अभिज्ञा म्हणाली ‘शूटिंग-प्रमोशन्स मध्ये व्यस्त असल्यामुळे खूप काही प्लॅन्स नाहीयेत. पण, नुकतीच मी पुरणपोळी बनवायला शिकल्यामुळे जेवणाचा बेत पुरणपोळी असणार आहे.’ लहानपणीच्या गुढीपाडव्याच्या आठवणी सांगताना अभिज्ञा म्हणते, उत्तम क्राफ्ट बनवत असल्यामुळे गुढी उभारण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असायची.

 

रोजच्या स्वयंपाकापेक्षा एखादी कॉंटिनेंटल डिश स्वतः बनवायला अभिज्ञाला आवडत. खवय्या वृत्तीच्या अभिज्ञाला गोड पदार्थ प्रचंड आवडतात. तिच्या आईच्या हातचे गुलाब जामून, गूळ पोळी, पुरण पोळी, रेड वेलवेट केक, मॅकरोनी हे तिचे आवडते पदार्थ आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञाने मिळून ‘तेजज्ञा’ नावाचा फॅशन ब्रँड मे २०१५ साली सुरु केला. फॅशन डिझाईनिंग हे खूप आधीपासून माझे पॅशन होते आणि तेजस्विनीचीही त्यात आवड होती, दोघींचेही पॅशन एकच असल्यामुळे एकत्र येऊन काहीतरी छान करण्याचा निर्णय घेतला. ह्या ब्रँडच्या अंतर्गत आम्ही पारंपरिक,आधुनिक आणि दोघांचे कॉम्बिनेशन करून डिझाइनर साडया, स्कर्ट, टॉप, वनपीस तयार करतो. त्यातही प्रामुख्याने खणाचा वापर करून डिझाइन्स तयार केले जातात. पैठणीचेही वेगवेगळे डिझाइन्स तयार करतो. आमची प्रत्येक साडी किंवा ड्रेस हा एक्सलुसिव्ह असतो, त्यातही आम्ही सेम डिझाईन रिपीट करत नाही असे अभिज्ञा सांगते. सुरुवातीपासून रिस्पॉन्स खूप छान आहे. साड्यांची ऑर्डर इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून घेतली जाते.डिझाइनर साड्यांसोबतच आम्ही आता ब्रायडल साड्याही लाँच केल्या आहेत असे अभिज्ञा सांगते

अभिज्ञाला स्वतःला साडी प्रचंड आवडते. फॅशनसाठी माझी पहिली आवड साडी आहे असे ती म्हणते. वेस्टर्न कपड्यांमध्ये फॉरेव्हर २१ हा तिचा आवडता ब्रँड आहे. अभिज्ञानाला भडक रंगापेक्षा सौम्य रंगाचे कपडे जास्त आवडतात. त्याचबरोबर ती स्ट्रीट शॉपिंगही एन्जॉय करते.

आवडत्या छंदा विषयी सांगताना अभिज्ञा म्हणते, मला टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवायला खूप आवडते. DIY हा तिचा आवडता छंद आहे. वेळात वेळ काढून ती हा छंद जोपासते. तिच्या घरापासून ते अगदी सेटवरच्या मेकअप रूम पर्येन्त सगळीकडे तिने तिची हि कला उपयोगात आणली आहे. कलाकार असल्यामुळे स्वतःतील सृजनशीलता बाहेर पडली पाहिजे आणि त्याचा अभिनय क्षेत्रातही खूप उपयोग होतो असे अभिज्ञा म्हणाली.

अभिज्ञाच्या आवडीचा आणखी एक विषय आहे तो म्हणजे प्रवास. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टयात मे महिन्यात आई-बाबांसोबत फिरायला जायचो आणि नंतर स्वतः एयरलाईन्स प्रोफेशनमध्ये असल्यामुळे प्रवासाची आवड निर्माण झाली असे अभिज्ञा म्हणते. भारतामध्ये अभिज्ञाला लडाखला जायचे आहे आणि भारताबाहेर बाली, मॉरशियसला, श्रीलंकेला जायचे आहे.

‘खुलत कळी खुलेना’ मालिकेतल्या मोनिकाच्या भूमिकेबद्दल विचारले असता अभिज्ञा म्हणाली, खूपच आव्हानात्मक रोल आहे.नकारात्मक भूमिका आहे तरीपण सर्व प्रेक्षकांना मोनिका आवडते. तिचीही एक बाजू आहे आणि प्रेक्षकांनी तिला आपलेसे केले आहे. मोनिकाचा मूळ स्वभाव वाईट नाहीये, परिस्थितीमुळे तिला तसे वागावे लागते. खूप छान प्रतिसाद आहे त्यामुळे काम करण्यास उत्साह येतो असे अभिज्ञा म्हणते. मोनिकेच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न ती करते आहे.

अभिज्ञाची आवडती अभिनेत्री ‘प्रियांका चोप्रा’ आहे तर ‘रणवीर सिंग’ आवडता अभिनेता आहे. भविष्यात अभिज्ञाला वेगवेगळ्या भुमिका सकारायच्या आहेत ज्यामुळे तिच्यातल्या सर्व गुणांना वाव मिळेल.

अभिज्ञाच्या भावी वाटचालीसाठी whatshelikes कडून खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.