मखाना खीर

मखाना हे पाण्यात वाढणाऱ्या एका वनस्पतीच्या बियांपासून तयार करतात त्याला (lotus seed) असेही म्हणतात. मखान्याची शेती बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त प्रमाणात केली जाते. मखाना खाण्याचे भरपूर फायदे आहेत. असे म्हणतात मखाना हे बदाम आणि आक्रोड पेक्षाही जास्त पौष्टिक आहे. आजकाल बरेच डायटिशिअन्स लो फॅट फूड बद्दल बोलताना मखाण्याच्या पदार्थांचा आवर्जून उल्लेख करतात. शिवाय मखाने उपवासालाही चालतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी त्याचा चिवडा, भाजी किंवा खीर काहीही बनवू शकता. मी केलेल्या खिरीची रेसिपी शेअर करत आहे. नैवैद्यालाही हि खीर चालते. करायलाही अतिशय सोपी आणि झटपटआहे.

४ वाट्या खीरीसाठी

साहित्य: २ वाट्या मखाने, २ चमचे तूप, ५-६ काजू, चिमूटभर वेलदोडा पूड, अर्धा लिटर दूध, साखर आवडीनुसार (अर्धी वाटी ) किंवा ४ चमचे मिल्कमेड.

कृती:

१. एका कडईमध्ये तूप गरम करून सगळे मखाने कुरकुरीत भाजून घ्या, भाजलेले मखाने एका ताटात काढून ठेवा, त्याच कडईमध्ये अर्धा चमचा तूप गरम करून काजू तळून घ्या.

२. अर्धा लिटर दूध उकळवून थोडे आटवून घ्या.

३. कुरकुरीत झालेल्या मखान्यातील अर्धी वाटी मखान्याची मिक्सरमधून पावडर बनवून घ्या. मी खीर करताना कच्य्या मखान्याची पावडर केली होती त्यामुळे ती खूप बारीक नाही झाली. भाजलेल्या मखान्याचीच पावडर करा.

४. आता भाजलेल्या मखान्यात आटविलेले दूध घालून परत उकळू द्या त्यात माखना पावडर टाकून मिक्स करा. आवडीनुसार साखर टाका साधारणपणे अर्धी वाटी साखर पुरे होते (मिल्कमेड वापरात असल्यास साखर टाकण्याची गरज नाहीये), तळलेले काजू, वेलदोडा पूड टाकून आणखी ५-७ मिनिटे खीर शिजू द्या. आवडत असल्यास मनुके, केसर टाकू शकता.

खीर गरम अथवा फ्रिज मध्ये ठेवून थंड कशीही छान लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.