Connect with us

निनावं

Recipes

निनावं

निनावं

“निनावं” हा पारंपरिक सी.के.पी पदार्थ आहे. ह्याला तुम्ही पारंपरिक केक म्हणू शकता. आधीच्या काळी पारंपरिक पद्धतीने हा विस्तवावर खरपूस भाजून तयार केला जायचा. गव्हाचे पीठ, बेसन, तूप, गूळ, नारळाचे दूध, वेलची पूड हे सगळे जिन्नस एकत्र करून बेक केल्यावर जो पदार्थ तयार होतो तो चवीला अप्रतिम लागतो. निनावं या शब्दाचा शब्दशः अर्थ ज्याला नाव नाहीये असा.दिवाळीच्या फराळात हा पदार्थ नक्की करून पहा.

साहित्य

१३ वड्यांसाठी
१ वाटी बेसन
१/२ वाटी गव्हाचे पीठ
एक किंवा दीड वाटी बारीक चिरलेला गूळ आवडीनुसार
२ वाट्या नारळाचे दूध
१/२ वाटी साजूक तूप
केशर, वेलची पूड आवडीनुसार.

कृती

प्रथम बेसन आणि गव्हाचे पीठ एकत्र करून तुपावर खमंग भाजून घ्या आणि थंड करा. (मी भाजताना तुपाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पीठ कोरडे न होता ओले झाले होते, तुपाचे प्रमाण अर्धीवाटीचं ठेवा म्हणजे पीठ कोरडे राहील. तूप जास्त झाल्यास बेक करताना नारळाच्या दुधाचेही तूप सुटून निनाव खूप तुपकट होतो. तूप जास्त सुटल्यास बेक झाल्यावर टिन वाकडा करून जास्तीचे तूप निथळून काढता येते.)

नारळाच्या दुधात गूळ विरघळून घ्या त्यात केशर आणि वेलची पूड टाका.

हे नारळाचे दूध भाजलेल्या पिठामध्ये गुठळ्या न होऊ देता घाला.

गॅसवर ठेऊन घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.

चांगले घट्ट झाल्यावर बेकिंग टिनला तुपाचा हात लावून त्याच्यावर नीट पसरवा. वरून थोडेसे तूप सोडा.

प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सियसला २०-२५ मिनिटे बेक करा. वरून खरपूस होईपर्येंत ठेवा.

 

थंड झाल्यावर वड्यापाडून सर्व्ह करा.

Bhakti D MBA in HR and Finance who found her love and passion in cooking and writing. She enjoys experimenting new recipes as much as enjoy playing with her son, she also brings her expertise as a parent and a qualified professional to WSL

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Recipes

 • Recipes

  मिल्क पावडर बर्फी

  By

  मिल्कपावडर बर्फी अतिशय सोपी, कमी साहित्यात आणि झटपट तयार होते. मिठाईवाल्याकडे मिळणाऱ्या मिल्क पेढ्यासारखी चव लागते....

 • Recipes

  चिरोटे रेसिपी

  By

  “चिरोटे” हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ आहे जो सणावाराच्या दिवशी आणि खासकरून दिवाळीच्या फराळासाठी तयार...

 • Recipes

  मखाना खीर

  By

  मखाना हे पाण्यात वाढणाऱ्या एका वनस्पतीच्या बियांपासून तयार करतात त्याला (lotus seed) असेही म्हणतात. मखान्याची शेती...

 • Recipes

  मशरूम पदार्थ

  By

  मशरूम खाण्याचे भरपूर फायदे आहेत जसे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, खनिजे...

 • Recipes

  15 Different Types of Paneer Recipes

  By

  Did you know that everyone’s favourite and popular Paneer’s history goes back thousand years ago. Fresh...
Trending

Follow US
To Top