Connect with us

आंब्याचा रस कसा टिकवावा

Food

आंब्याचा रस कसा टिकवावा

आंब्याचा रस कसा टिकवावा

आंबा हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे आवडते फळ आहे. जून महिना सुरु होताच आंब्याचाही मौसम कमी होतो. पण तुम्हाला जर आंबे वर्षभर खायचे असतील तर घरच्याघरी प्रिझर्वेटिव्ह शिवाय आंब्याचा रस टिकू शकतो कसा ते पहा-

१. आंबापोळी

साहित्य- ६ हापूसचे पिकलेले आंबे, साखर

कृती-

आंबे धुऊन पुसून त्याचे देठं काढावीत, त्यानंतर हाताने दाबून हळूहळू आंबे मऊ करावे.

स्टीलच्या पातेल्यात एका-एका आंब्याचा रस काढावा. साल उलटी करून सर्व आंब्याचा रस काढून घ्यावा(पाणी टाकू नये). तसेच कोयांचा (बाठीचा) रस नीट पिळून घ्यावा. १० वाट्या रस असेल तर पावपट म्हणजे अडीच वाट्या साखर घालून तो रस मिक्सरला लावून घ्यावा. मग ताटाला तुपाचा हात लावून त्यात आकाराप्रमाणे दीड ते दोन वाट्या रस पसरावा ताट गोल फिरवून नैसर्गिकपणे रस पसरून घ्यावा व ती ताटे कडक उन्हात उंचावर वाळविण्यास ठेवावीत.

दोन तीन उन्हाने रस सुकतो पोळी थोडी ओलसर असतानाच कडेकडेने सोडवून उलटून टाकावी. पुन्हा उन्हात खडखडीत वाळवून त्याचे सारख्या आकाराचे तुकडे करावेत. पुन्हा ऊन देऊन हवाबंद डब्यात ठेवाव्यात. या पोळ्या वर्षभर टिकतात आणि तुम्ही कधीही आंब्याचा रस, मँगो शेक किंवा अन्य आंब्याचे पदार्थ बनऊ शकता.

२. आंब्याचा मावा

वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे रस काढून तो जाड बुडाच्या पातेल्यात गॅसवर ठेवावा. स्टीलच्या वा लाकडाच्या उलथन्याने एकसारखा ढवळत राहावा. हळूहळू रस खदखदू लागतो. भांडं मोठं घ्यावं गरम झालेल्या रसाचे थेम्ब बाहेर उडतात. रस दाट झाला म्हणजे त्यात पावपट साखर घालावी. रस साखरेच्या पाकने पातळ होतो. परंतु पुन्हा सुकू लागतो. घट्ट गोळा होईपरेंत मंद उष्णतेवर रस सुकवावा. रस निवळला की त्याचा दाबून घट्ट गोळा करावा. तुपाच्या हाताने गोळा करून साखरेत घोळवा व हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.हा रसही काळजीपूर्वक केल्यास वर्षभर उत्तम राहतो व केंव्हाही त्याची बर्फी. मँगो शेक किंवा अन्य आंब्याचे पदार्थ बनविता येतात.

Bhakti D MBA in HR and Finance who found her love and passion in cooking and writing. She enjoys experimenting new recipes as much as enjoy playing with her son, she also brings her expertise as a parent and a qualified professional to WSL

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Food

 • Food

  शेवळीची भाजी

  By

  शेवळी/शेवळा ही पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात येणारी रानभाजी आहे. ही भाजी खाल्ल्याने पावसाळ्यात...

 • Food

  हैद्राबादी स्टाईल कैरीचे लोणचं

  By

  आपल्याकडे लोणच्याचे निरनिराळे प्रकार आणि ते बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. आंध्र प्रदेशात केले जाणारे लोणचे हे...

 • Food

  20 Keto Approved Recipes

  By

  Keto Diet is the latest buzz diet now a days. Want to know why? Keep reading...

 • Food

  पेरू चिली आईस्क्रीम

  By

  साहित्य- ४ पिकलेले पेरू १ वाटी कंडेन्सड मिल्क १ वाटी क्रीम चीझ २ चमचा फ़्रेश क्रीम...

 • Food

  बालूशाही

  By

  बालूशाही हा गोड पदार्थ भारतातल्या विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. भारताबाहेर बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमध्येही बालूशाही...
Trending

Follow US
To Top